घरात राहूनच व्यायाम करण्याचा सल्ला: अभिनेत्री मृणाल दुसानीस

  • 3 years ago
पडद्यावर ठामपणे भूमिका मांडणे, ती भूमिका जगणं, तिच्याशी एकरूप होणं अशी सारी वर्णने आली की आपल्या डोळ्यासमोर चेहऱ्यावर कायम हास्य असणारी, निरागस अभिनेत्री मृणाल दुसानीस येते. माझिया प्रियाला प्रीत कळेना, असं सासर सुरेख बाई, सुखाच्या सरींनी हे मन बावरे यासारख्या कितीतरी मालिका, चित्रपटामधुन तिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद असल्याने ती घरात राहूनच व्यायाम करत आहे. रसिकांनाही व्यायाम करण्याचा सल्ला देत आहे.