घरातच राहून व्यायाम करा: अभिनेता योगेश थोरात

  • 3 years ago
गुलदस्ता, जरब, जिद्द यासारखे अनेक चित्रपट, तू अशी जवळी राहा, असं सासर सुरेख बाई, क्राईम डायरी यासारख्या विविध मालिका तसेच व्यावसायिक नाटके यांमधून अभिनेता योगेश थोरात याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायाम करून त्याचा सदुपयोग केला जात आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन तो करत आहे.