माहूर तालुक्यात पुनर्वसित गावठाण वायफणीच्या नागरी सुविधा हस्तांतरित | Nanded | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
माहूर तालुक्यातील बहुप्रतिक्षित तसेच बहुचर्चित मनिरामखेड सिंचन प्रकल्पाची घळभरणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुनर्वसित वायफणी गावाचे पुनर्वसन करून नवीन वसाहतीत जलसंपदा विभागामार्फत निर्माण करण्यात आलेल्या नागरी सुविधा शनिवारी (ता.सहा मार्च) जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी नागरी सुविधांचे हस्तांतरण केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पबाधित नागरिकांच्या सूचना, तक्रारीचा निपटारा करून घरकुल, शौचालय आदी योजनांचा तातडीने लाभ देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
(व्हिडिओ : साजीद खान, वाई बाजार, जि. नांदेड)
Recommended