मनिरामथड प्रकल्पाची घळभरणी पुनर्वसना शिवाय अंतिम टप्प्यात.| Nanded | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
माहूर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करणाऱ्या मनिरामथड प्रकल्पाच्या कामाला सन २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर काम सुरु होऊन अंतिम टप्यात आले असून घळभरणीला
सुरुवात झाली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असून पाण्याच्या
पातळीत वाढ होऊन पाणी टंचाइचा प्रश्न निकाली निघणार आहे.या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पामुळे वायफणी गावचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन वसाहतीचे कामास सुरुवात
झालेली आहे.पुनर्वसन कामात तरतूद केल्या नुसार अधिकांश कामा पैकी केवळ
शाळा,ग्राम पंचायतच्या इमारतीचे काम झाले आहेत तर उर्वरित कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने आधी नवीन
वसाहतीचे काम पूर्ण करा व त्यानंतरच घळभरणी करा अशी मागणी करीत विस्थापित वायफनी गावातील ५८ ग्रामस्थांनी नवीन वसाहतीत जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसमोर (ता.५)फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरु केले असूनआज जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली असता जोपर्यंत प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते उपोषण आंदोलनावर ठाम असल्याच्या प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त वायफणी येथील ग्रामस्थांनी दिल्या आहेत.

(व्हिडिओ:साजीद खान,माहूर जि.नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended