केंद्रीय कीटक व्यवस्थापन पथक वाई बाजारला दाखल|sakal|sakal nanded|
  • 3 years ago
केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने बोंडसड,बोंड अळी ने ग्रस्त नांदेड जिल्ह्यातील माहूर तहसीलच्या वाई बाजार येथील शेतकरी बंडू मारुती गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी आज (ता.२०) रोजी करून मौलिक मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले.यात प्रामुख्याने ‘अमृत पॅटर्न’ चे जनक अमृतराव देशमुख यांनी बोंड अळी संदर्भात नांदेड जिल्ह्यातील क्रॉस तपासणी पथकासमोर मांडलेले मुद्दे साक्षात केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी देखील मान्य केले असून या क्षेत्रांमधील कापूस पिकावर बोंडअळी चा प्रादुर्भाव नसून बोंड सड चा प्रकोप असल्याचे वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.सोबतच शेतकऱ्यांना समूह शेतीचा सल्ला देत शेतकऱ्यांना नागपूर येथे कीटक व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षण देणार असल्याची माहिती दिली. केंद्राच्या पथकात वनस्पती संरक्षण अधिकारी एस.महेश, वनस्पती पॅथॉलॉजी चे तांत्रिक अधिकारी के.नीतीराज यांचा समावेश होता.तर या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती...(व्हिडिओ:साजीद खान/वाई बाजार, जि.नांदेड:)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended