नांदेड येथील मोडकळीस आलेल्या छताखाली नवजात शिशू बालकांवर उपचार सुरू | Nanded | Sakal Media |
  • 3 years ago
मागील तीन महिन्यांपासून ४४ लाखाचे बजेट आले असताना
श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग बाद झालेल्या इमारतीमध्येच सुरू आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच इमारतमधील प्रसूती विभागातील एका वार्डातील बाळांत महिलेच्या अंगावर छताचा गिलावा पडून महिलेला गंभीर दुखापत झाली होती. त्याच इमारतीमध्ये मोडकळीस आलेल्या छताखाली नवजात शिशू बालकांवर उपचार सुरू असल्यामुळे भंडारा येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
(व्हिडिओ ः शिवचरण वावळे, नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended