Narayan Rane यांच्या 'अधीश' बंगल्यातील अनधिकृत बांधकाम लवकरच पाडण्याचे न्यायालयाचे निर्देश

  • 2 years ago
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील (Juhu Adhish Bunglow) अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाला आढळले आहे. दोन आठवड्यात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

#NarayanRane #Demolition #Adheesh #Juhu #BMC #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #Mumbai #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews

Recommended