Kolhapur: कळपाच्या प्रतीक्षेत संतापतोय गणेश तस्कर

  • 2 years ago
#kolhapur #elephantattack #elephant #kolhapurnews #elephantnews
कोल्हापूर(Kolhapur) : कुटुंबातील कर्ता गडी घरा बाहेर पडल्याने त्या घरची माय मुलांना जगवण्याची धडपड नेटाने करीत आहे. घरातील गड्या विनाच एकाकी फिरणाऱ्या मायच्या कुटूंबावर स्वामीत्व हक्क गाजविण्यासाठी बाहेरचा दुसराअनोळखी नायक पुढे सरसावला. त्यासाठी तो भलतीच आक्रमकता दाखवत दहशत निर्माण करीत आहे. तरीही ति माय आपल्या दोन्ही पिल्लांना त्या नायकापासून दूर ठेवत आहे. इतक्यात तो घरा बाहेर गेलेला तो कर्ता गडीही कुटूंबाजवळ पून्हा येत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात विस्कळीत झालेले हे कुटूंब पून्हा स्थिरस्थावर होताना त्या खलनायकासोबत संघर्ष घडतो की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
(बातमीदार :शिवाजी यादव)

Recommended