KolhapurNews | स्टार्टअप आर्टस्‌ विथ वॉल पेंटींग |
  • 3 years ago
कोल्हापूर : पंचायत समितीच्या मागील सीता कॉलनीत राहणाऱ्या तेजस विजय सावंत यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात भिंतीवरील (वॉल पेंटींग) चार मीटर बाय साडेतीन मीटरचे मार्व्हलसची ऍव्हेंजरी सिरीज पेंटींगने चित्रित केली. या पेंटींगचे वैशिष्ठ्य म्हणजे, ऍव्हेंजरमधील हिरो आणि व्हिलन असे 34 पोट्रेटस्‌ एकत्रितपणे पेंट केले आहेत. याशिवाय अन्य चित्रे ही भिंतीवर रेखाटली आहेत. जसे की, जॉनी डीप, आयर्न मॅन अशाही चित्रांचा समावेश आहे. तेजस यांनी आर्किटेक्‍चरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या तो सिनेमेटॉग्राफीचे शिक्षण मुंबईत करत आहे. चार महिन्यांच्या काळात त्याने भिंतीवर या मालिका रेखाटल्या आहेत. ज्यांना भिंतीवर चित्रे रेखाटायची आहेत, त्यांनीही आपल्या बंगल्यात, फ्लॅटस्‌मध्ये, घरामध्ये अशी चित्रे तेजसकडून रेखाटून घेतली आहेत. तेजस भिंतीवर कसे चित्र रेखाटतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहता येईल. चित्राच्या माध्यमातूनसुद्धा असे स्टार्टअप यशस्वी ठरु शकते, हे तेजसने सिद्ध करुन दाखविले आहे.

रिपोर्टर : अमोल सावंत

#wallpaintings #startup #art #kolhapur #youth #tejassawant #sakal #sakalnews
Recommended