Elephant in Kolhapur

  • 3 years ago
पळाली हत्तीण, पळाले कोल्हापूर!
कोल्हापूर - सैरभैर झालेल्या एका पाळीव हत्तीणीने आज गंगावेस, रंकाळा, साने गुरुजी वसाहत ते कळंबा परिसरात सुमारे तीन तास गोंधळ उडवून दिला. बिथरलेल्या अवस्थेत वाट दिसेल तिकडे जाणारी हत्तीण नागरी वस्तीकडे जाऊ नये, म्हणून रोखण्यासाठी दोन माहूत, अग्निशमन दल, पोलिस, वनखाते यांनी प्रयत्नांची मोठी शर्थ केली. बिथरलेली ही हत्तीण बराच काळ साने गुरुजी वसाहत या फारशी वर्दळ नसलेल्या परिसरातच फिरत राहिल्याने मोठा अनर्थ टळला. उपनगरात गेलेली ही हत्तीण परत वळून शहरात येऊ नये, म्हणून तिला कळंब्याजवळ भुलीचे इंजेक्‍शन देण्यात आले व त्याचमुळे तिला रोखण्यात यश आले. दरम्यान, महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजक आणि हत्तीणीच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Recommended