Lokmat Politics News | पंतप्रधान मोदींचा संसदेत प्रश्न | हिंदू दोन विवाह करत तुरुंगात गेला तर...
  • 3 years ago
'तीन तलाक' विधेयकाला ब्रेक लावण्याचा आरोप करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला धारेवर धरलं. 'जर हिंदू व्यक्ती दोन विवाह करून तुरुंगात गेला तर त्याच्या कुटुंबाचं पालन-पोषण कोण करणार?' असा प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित केला. तीन तलाक'च्या विधेयकात असा तलाक देणाऱ्या व्यक्तीला तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. त्यावर, आरोपी तुरुंगात गेला तर पीडित महिलेचं पालन-पोषण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करत या विधेयकाला राज्यसभेत ब्रेक लागला होता.काँग्रेसच्या 'नेम चेंजर' टीकेला प्रत्युत्तर देताना आपला 'नेम चेंजर' नाही तर 'ऐम चेंजर' म्हणजेच लक्ष्यचा पाठलाग करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं.भाजप वर टीका करता करता तुम्ही भारतावर टीका सुरू करता.मोदीवर हल्ला करताना तुम्ही हिंदुस्तानावर हल्ला करता' असंही आपल्या भाषणात मोदींनी म्हटलंय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended