पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट

  • 3 years ago
पिंपरी चिंचवडमध्ये शहीद अशोक कामटे बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या पीएमपी बसने (एम एच १२ एच बी ४०१) अचानक पेट घेतला. पण अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.