स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांनी रात्री शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत साजरा केला 31st..

  • 3 years ago
बुलढाणा

'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांनी रात्री शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत साजरा केला 31st.. तुपकरांनी शेतातच शेतकऱ्यांसोबत घालवली रात्र..!

जगभरात नवीन वर्षाचे आगमन झालेय.. 2021 या नवीन वर्षाचे जोरदार आतिशबाजी शहरांमध्ये स्वागत करण्यात येतेय.. शेतकऱ्यांना नवीन वर्ष काय आणि जुने वर्ष काय सर्व सारखेच असते..कारण शेतकऱ्यांची परिस्थिती वर्षानुवर्षे सारखीच आहे. सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत होत असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आगळा-वेगळा 31 st साजरा केला..त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात रात्री गव्हाला पाणी देवून परिसरातील शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. शेतकऱ्यांसोबत चटणी - भाकर खावून जेवण केले. यावेळी तुपकरांमधील शेतकरी बघायला मिळाला. स्वतः तुपकरांनी शेतात उतरून पिकाला पाणी देण्याचे काम केले.रात्री पाणी देण्यासाठी आलेल्या परिसरातील शेतकऱ्यांशी रविकांत तुपकरांनी संवाद साधला..

इतर उद्योगांना पूर्णवेळ वीज, पाणी मिळते व पायाभूत सुविधा मिळतात. पण शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा तर सोडाच साधी पूर्णवेळ वीज ही मिळत नाही. मिळते ती तर रात्री फक्त 8 तासच..! जंगली जनावरे, साप-विंचू काट्याची पर्वा न करता शेतकरी अन्नधान्य निर्मितीचे काम करतो..अंबानी-अदानी ला वेगळा न्याय व शेतकऱ्यांना वेगळा न्याय का..? असा सवाल उपस्थित करत तुपकरांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली..नवीन वर्षात तरी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे व शेतकऱ्यांचं माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केले पाहिजे, अशी अपेक्षा तुपकरांनी व्यक्त केली..

Recommended