सातारा शहर एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर बनवावे :रामराजे नाईक निंबाळकर

  • 3 years ago
सातारा : सातारा नगर पालिकेने पक्षीय आणि गटतटाचे राजकारण बाजूला ठेऊन या ग्रेड सेपरेटची ऐतिहासिक कामगिरी ताब्यात घ्यावी. सातारा शहर एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर बनवावे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

साताऱ्यातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे आज शासकीय उदघाटन व लोकार्पण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Recommended