हे तर स्थगिती सरकार - खा. प्रितम मुंडे

  • 3 years ago
राज्य सरकारने आजपर्यंत सर्वात मोठं काम कोणतं केलं असेल तर त्या बदल्या केल्या आहेत आणि बंगल्यांचं नुतनीकरण केलं आहे.बंगल्याचं नुतनीकरण करायला सरकारकडे पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांचं अनुदान द्यायला पैसे नाहीत.अनुदान देण्यापासून राज्य सरकार पळवाट काढत असल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी जालना येथे केला आहे.त्या जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी प्रीतम यांनी सरकारला स्थगिती सरकार म्हणून संबोधत चांगल्या योजनांना सरकारने स्थगिती देऊन हे सरकार बिघाडी सरकार असल्याचा टोलाही त्यांनी हाणला