शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

  • 3 years ago
मुंबई : सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार राज्यभर दौरे करत असून त्यांना आपण न फिरण्याची विनंती करणार आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोना लशीची मानवी चाचणी आॅक्सफर्ड व सिरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु असून येत्या दोन महिन्यांl कोरोनाची लस उपलब्ध होईल, अशी शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews