आमदार हर्षवर्धन जाधवांनी धरला ठेका

  • 3 years ago
औरंगाबाद : कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी रामनवमी निमित्त शहरातून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे भेट दिलेल्या बैंजोच्या तालावर जाधव यांनी हातात माईक घेऊन चक्क गाणे म्हटले. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत अगदी तालासुरात म्हणत जाधव यांनी आपल्यातील सुप्त कलेचा परिचय देखील उपस्थितांना करून दिला. गाण्याची दोन-तीन कडवी गायल्यानंतर जाधव यांनी हातात भगवा झेंडा घेऊन मिरवणुकीत ठेकाही धरला.

Recommended