भंगार बाजार प्रकरणी नगरसेवकांनी लाच मागितल्याचा काँग्रेसचा आरोप

  • 3 years ago
नाशिक : शहरातील चुंचाळे परिसरातील भंगार बाजार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविल्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाने मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हा बाजार हटविण्यासाठी काही नगरसेवकांनी हॉटेलमध्ये बैठक घेऊन पाच कोटीची लाच मागितली होती. ती पूर्ण करता आली नाही. म्हणूनच अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. त्यामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून हे नगरसेवक कोण? अशी चर्चा होत आहे.

Recommended