आमदार रमेश कदमची पोलिसांना शिवीगाळ

  • 3 years ago
सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना आमदार रमेश कदम याने धमकावल्याची चित्रफीत वायरल झाल्यानंतर याप्रकरणी नागपाडा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय महामंडळाच्या निधीतील 132 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी 2015मध्ये रमेश कदमला अटक झाली होती.

वैद्यकीय तपासणीसाठी कदम याला गुरुवारी भायखळा कारागृहातून जे.जे. रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी कदम थेट चालत सुटला. पोलिस व्हॅन आली नसल्यामुळे पोलिस अधिकारी पवार याने कदम याला बाजूला उभे राहण्यासाठी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कदम यांनी पवार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली, अशी माहिती नागपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने दिली. त्यानंतर कदम याने पवार यांना शिवीगाळही केली.

Recommended