आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस स्टेशनमध्ये घेतले विष | Akola | Mahrashtra | Sakal Media |

  • 3 years ago
आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस स्टेशनमध्ये घेतले विष
अकोला - बाळापूर शहराजवळच्या नदीपात्रात बुधवारी एका १५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच मृत महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रसाद प्रकाश चितरंग असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. बाळापूर जवळच वाहणाऱ्या मन नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळून आला, तर आईचा मृतदेह आज मिळाला.

बाळापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांकडून चौकशी केल्यानंतर दोन जणांनी नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून बाळापूर पोलिसांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधून, सदाफळे यांच्या पथकाद्वारे नदीपात्रात दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू केला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नव्हता.

मृत युवकाच्या मामाने बाळापूर पोलिसात दिलेल्या माहिती नुसार, त्याची बहीण मनिषा गोविंद पाटिल हिचा विवाह बाळापूर नाका, अकोला येथील रहिवासी प्रकाश चितरंग यांच्यासोबत झाला होता. त्यांना प्रसाद हा एकुलता एक मुलगा आहे. बहीण मनिषा चितरंग ही आरोग्य विभागात नोकरी करते. जावई प्रकाश चितरंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनिषाने त्याच विभागातील व्यक्तीशी लग्न केले. मात्र बुधवारी सायंकाळी मनिषाचा मुलगा प्रसादचा मृतदेह नदीपात्रात आढळला, तर मनिषाही बेपत्ता असल्याने तिनेही नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस शोध घेत होते.

गुरुवारी रात्री ८ वाजता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडला. नाल्यापासून परत घटनास्थळी नदीपर्यंत अंधारातून रेस्क्यू बोटीने मृतदेह आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने केले आणि महिलेचा मृतदेह पात्रातून बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी मनिषा चितरंग हिचा दुसरा विवाह झाला होता. बुधवारी प्रसाद प्रकाश चितरंग याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती व मनिषा चितरंग बेपत्ता असल्याने मनिषाच्या पतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये ध

Recommended