संगमनेर : मागासवर्गीय सरपंचाला घातला चपलांचा हार; पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

  • 3 years ago
संगमनेर तालुक्यातील कसारे गावात सरपंचांना मागासवर्गीय असल्याने चपलांचा हार घातला गेल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महेश अण्णासाहेब बोराडे हे अनुसूचित जातीजमातींसाठी राखून ठेवलेल्या जागांमधून सरपंच म्हणून निवडून आले. परंतु महेश बोराडे कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना अडवून गावातील काही लोकांकडून चपलांचा हार घालण्यात आला. मागासवर्गीय सरपंचाचा सत्कार असाच करायचा असतो असं म्हणत हे लाजिरवाणं कृत्य केलं. या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Recommended