मेळघाट मधील रेल्वेमार्गाची ऐतिहासिक धरोहर नामशेष ? | Akola | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
रेल्वे प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या तसेच महाराष्ट्राला मध्यप्रदेश सोबत आणि दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून सिकंदराबाद जयपुर मीटरगेज रेल्वेमार्ग ओळखला जातो. ह्या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये कन्वर्जन करण्याचे काम अकोला ते अकोट पूर्ण झाले आहे अकोट ते अमला खुर्द हा टप्पा मेळघाट मधून गेलेला असल्याने हा मार्ग मेळघाट मधूनच न्यावा की मेळघाट एवजी बाहेरून न्यावा याबाबत दोन मतप्रवाह असून हा विषय अत्यंत किचकट झाला असून अकोट ते आमलाखुर्द या मार्गाचे नवीन काम सुरू करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश निघालेले नाहीत.
परंतु सातपुडा पर्वतातुन जाणार्‍या या मार्गावरील प्रसिद्ध मराठीतल्या "चार चा आकडा" आणि धूळघाट रेल्वे स्टेशन दरम्यानचा दरगाह जवळच्या नदीवरील अत्यंत मोठ्या पुल अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर सदर फुल पडण्याचे छायाचित्रे आणि त्याच्यासोबतचा मजकूर व्हायरल होत आहे. त्यामध्ये उल्लेख आहे की
खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांना यश, धुलघाट रेल्वे येथे जुने रेल्वे ब्रिज पाडण्याचे काम चालू झालेले आहे लवकरच रेल्वेचे नवीन काम चालू होईल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended