पैलपाडा जवळ गीतांजली एक्स्प्रेस रुळावरून घसरली.| Akola | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
अकोला : पैलपाडा नजीक गीतांजली एक्सप्रेसचे एक डब्बा रुळावरून घसरला. मंगळवारी पहाटे पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेचा सर्वांत शेवटचा गार्ड डब्बा घसरल्याने या घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. हावडावरून मुंबईकडे निघालेली गीतांजली एक्सप्रेस पैलपाडा रेल्वे फाटकावर पोहोचली. यावेळी समोरून दुसरी प्रवासी रेल्वे येत होती. दोन्ही गाड्यांचा वेग अधिक होता. याच दरम्यान गीतांजली एक्सप्रेस अनियंत्रित झाल्याने सर्व प्रवासी डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. रेल्वेचे डबे कोसळणार अशी भीती प्रवाशांमध्ये होती. या घटनेत रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाल्याने दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(व्हिडिओ - विनोद इंगोले)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended