इस्लामपुरात मंडई स्थलांतराचा वाद शिगेला; थेट पालिकेच्या आवारातच भरवली मंडई | Sangli | Sakal Media |
  • 3 years ago
इस्लामपूर (जिल्हा सांगली) : इस्लामपुरातील जुनी गणेश भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना नव्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत हलविण्यावरून प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वाद आज शिगेला पोचला आहे. आज शनिवारी जुन्या मंडईत बसण्यास विक्रेत्यांना पोलिसांनी अटकाव केल्याने तणाव वाढला. पोलिसांनी अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगरल्याने विक्रेत्यांनी थेट नगरपालिका गाठली आणि पालिका इमारतीच्या आवारातच भाजी मंडई भरवली. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच असा हा प्रकार घडला आहे. माजी नगरसेवक कपिल ओसवाल आणि वाळवा तालुका संघर्ष समितीचे नेते शाकीर तांबोळी यांनी व्यापाऱ्यांचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान पदाधिकारी कालपासून सुरू असलेल्या या प्रकारावर मात्र गप्प असल्याने नाराजीचा सूर आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended