तक्रारीकरिता पोलीस नियंत्रण कक्षात कॉल थेट गृहमंत्री उचलतात तेव्हा नेमकं काय घडलं | Sakal Media |
  • 3 years ago
तक्रारीकरिता पोलीस नियंत्रण कक्षात केलेला कॉल थेट गृहमंत्री उचलतात तेव्हा नेमकं काय घडलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याचं झालं असं की गृहमंत्री अनिल देशमुख काल रात्री पुणे पोलीस आयुक्तालयात आले होते, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत त्यांनी नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वायरलेसवरुनही कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या. नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही कॉल घेतले. यामध्ये एका नागरिकाने सोसायटी परिसरात मोठ्याने गाणी वाजत असल्याची तक्रार केली असता अनिल देशमुख यांनी त्यांना आपली तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला सांगतो असं कळवलं. थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने या पुणेकरालाही आश्चर्याचा धक्का बसला. सिंहगड रोडवरील सनसिटी परिसरात राहणाऱ्या इंद्रनील हात्ते या नागरिकाचा हा कॉल होता त्यांच्याशी एक्सक्लुझिव बातचीत केलीय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने

121 इंद्रनील हात्ते(गृहमंत्र्यांनी कॉल उचललेला पुणेकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended