अडीच वर्षाच्या चिमुरडीचा पराक्रम:अनेक गड केले पायी सर | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील मुद्रा अर्चना प्रशांत करंडे या अडीच वर्षाच्या चिमुरडीने किल्ले रायगड, शिवनेरी, जंजिरा, हडसर, निमगिरी, पद्मदुर्ग, नारायणगड पाठोपाठ रविवारी (ता. २४) महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच कळसूबाई शिखर चार तासांत पायी सर केले. शिखरावर कळसूबाई मातेच्या मंदिरासमोर अर्चना यांनी शिवविचार व्यक्त करून प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्चना, मुद्रा, पायल खेबडे (वय. १३) व गिर्यारोहक रोहित जाधव यांनी हातात तिरंगा घेऊन कोविड योद्धे व भारतीय जवान यांना मानवंदना दिली.
आईची व्याख्यानेही ती लक्षपूर्वक ऐकते. व्याख्यान झाल्यानंतर करड्या आवाजात मुद्रा शिवगर्जना करते. मुद्रा अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली एक आगळी वेगळी शिवकन्या आहे. किल्ले हडसर येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवेशद्वार सोहळा कार्यक्रमात शिवगर्जना आणि शिवविचार मुद्राने मांडले. भविष्यात मुद्रा प्रसिद्ध शिव व्याख्याती व गिर्यारोहक होईल, असा मला विश्वास आहे असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. खासदार कोल्हे यांच्यासमोर मुद्राने दिलेली शिवगर्जना सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होत आहे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended