मोर्चासाठी जाणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी नागपुरातच अडवले | Nagpur | Bacchu Kadu | Sakal Media |
  • 3 years ago
नागपूर : सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असताना पोलिसांना आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश आहेत, असे सांगितले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हूकले. मी आता फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय? आजचा मोर्चा शांततेनेच होणार आहे. तरीसुद्धा अडवून ठेवण्यामागचे कारण कळले नाही. नेमके कोण अडवत आहे, याचा शोध घेत आहो. मी नाही गेलो तरी आजचे आंदोलन होणारच आहे. मोर्चा नक्की निघेल. सर्व जण तेथे पोहोचले आहेत. आमचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत आणि मीसुद्धा मुंबईला पोहोचणारच आहे. अजून दोन विमान आहेत. तरीही अडवले तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेनच, असे बच्चू कडू म्हणाले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर आज अखिल भारतीस किसान संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना नागपुरातच अडवले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended