गुमगाव येथील दिनेश लोखंडे यांनी नियोजन आणि परिश्रमातून फुलविली रेशीम शेती | Nagpur | Sakal Media |

  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील ३४ वर्षीय दिनेश नारायण लोखंडे या युवा शेतकऱ्याने नियोजन आणि परिश्रमातून अत्यल्प खर्चात दीड एकर तुती आणि साधा शेड उभारून लाडगाव शिवारामध्ये रेशीम शेती फुलविली आहे. जिल्हा रेशीम कार्यालय आणि बुटीबोरी येथील श्री. निखाडे यांचे मार्गदर्शन, उन्हाळभर शेतात राबून अगदी १५ ते २० हजार रुपये खर्चातून बांबूच्या मदतीने उभारलेले शेड आणि रॅक, सुदीप कांबळे यांनी तुतीचे दिलेले विनामूल्य कलम, तुतीच्या लागवडीनंतर केलेल्या नियोजनानंतर अवघ्या १२०० रुपयाचे रेशीम कीटक खरेदी करून ५ जानेवारीपासून दिनेश यांच्या पहिल्या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता अवघ्या दोन दिवसांत रेशीम कोष तयार होणार असून रेशीम विक्रीसाठी तयार होत आहे. यातून ३५ ते ४० किलो रेशीमचे उत्पन्न होण्याचा दिनेश यांना विश्वास आहे. ४०० ते ४५० रुपये किलो बाजारभाव असलेल्या रेशीममधून दिनेश यांना पहिल्याच प्रयोगातून अवघ्या २५ दिवसांत १६ ते १८ हजार रुपयांचे उत्पन्न होण्याचा विश्वास आहे. दर महिन्याला शाश्वत आणि जास्त उपन्न देणाऱ्या रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे, असे आवाहन दिनेश यांनी केले आहे. (व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended