संजय वाकडे यांनी सांगितले रब्बी हंगामातील पीक नियोजन! | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : यंदाच्या रब्बी हंगामात एकूण १६ हजार ५६ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी १३ हजार २५० हेक्टरमध्ये हरभरा तर तीन हजार ७६१ हेक्टर जमिनीत गहू या दोन प्रमुख पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरी बंधूनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असा सल्ला तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिला. याशिवाय कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करतेवेळी पक्के बिल घ्यावे आणि पेरणीनंतर बीजांकूर निघेपर्यंत ते बिल सांभाळून ठेवावे, जेणेकरून बियाणे बोगस निघाले तर कृषी केंद्राकडे भरपावती मागता येईल.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended