धानोली पुलावरील प्रवास ठरतोय धोकादायक | Nagpur | Maharashtra | River Bridge | Sakal Media |
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील वागधरा व धानोली या गावांना जोडणाऱ्या वेणा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नाहीत. पुलावर होणाऱ्या जडवाहतुकीमुळे आता पुलावरील सिमेंट-काँक्रिट उखडू लागले आहे. लोखंडी सळाखी बाहेर पडू लागल्या आहे. त्यामुळे या पुलावर पुन्हा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. पुलावरील संरक्षक कठडे काढल्याने वाहनचालकांना जीव मुठित घेऊन पूल ओलांडावा लागत आहे. दिवसेंदिवस या मार्गाने जडवाहतूक वाढत असल्याने पुलावर खड्डे पडणे, काँक्रिट उखडणे आणि लोखंडी सळाखी बाहेर पडणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर संरक्षक कठडे लावून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. (व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended