सोयाबीनने केला घात, तुरीने दिली साथ | Nagpur | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
चार एकरातील मातीमोल झालेल्या सोयाबीनची चिंता सोडून उरलेल्या तूर पिकाचे योग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील ४५ वर्षीय मेघनाथ साठवणे यांच्या परिश्रमाला सध्या उन्नतीचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच तुरीचे पीक काढणीवर येणार आहे. सोयाबीनने मारल्यानंतर तुरीने तारल्याने तुरीचे पीक साठवणे यांना लाखमोलाचे ठरणार आहे. चार एकर क्षेत्रात तुरीचे अक्षरशः जंगल निर्माण झाले आहे. तूर झाडाखाली गेलेला व्यक्ती दिसतही नाही. सध्या साठवणे यांची तूर परिसरातील अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. (व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended