राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन | Nagpur | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी उमरेड तालुक्यातील तसेच अन्यत्र भागातील जनतेकडून निधी गोळा करण्याकरिता कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्या अनुषंगाने (ता.१०) रोज रविवारी स्थानिक संताजी जगनाडे व्यवसायिक संकुल परिसरात राम मंदिर निधी समर्पण महा अभियान कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प. पू. शिवयोगी दत्ता महाराज जोशी, श्री शिवशक्ती पीठ, उमरेड यांचे शुभहस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी विशेष उपस्थिती माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया, आनंदराव राऊत ज्येष्ठ उद्योजक कमल किशोर सारडा, ज्येष्ठ कार सेवक विजय नगर नाईक यांची मंचावर उपस्थिती होती.
(व्हीडिओ: सतीश तुळसकर).
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended