त्या वाघाला आता ठार माराच I Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर स्टेशन, राजुरा व कोठारी वनपरिक्षेत्रात वावरणाऱ्या वाघाने आतापर्यंत दहा शेतकरी व शेतमजूर यांचा बळी घेतला. सध्या शेतकऱ्यांची कापूस वेचणी, सोयाबीन व धानाची कापणी व शेतीचा हंगाम जोरात सुरू असून, नरभक्षी वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी दुपारीच शेतातून परततात. वाघाला पकडणे शक्य नसल्याचे दिसून येत असल्याने त्याला ठार मारावे, अशी मागणी विरुर स्टेशन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, मधुकर चिंचोलकर, बळीराम खुजे, कपिल ईद्दे यांनी केले.
(व्हिडिओ : गजानन ढवस/ आनंद चलाख)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended