विदर्भातील मंगळवारच्या महत्वाच्या घडामोडी | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
महापालिका, मेडिकल, मेयोत कोरोना रुग्णांना सेवा देणारे तीन हजार कोरोनायोद्धे बाधित झाले आहेत. त्यामुळे कोव्हिड विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने तयार केलेल्या नियमांचे पालन करण्यासोबतच स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना केले.
महापौर संदीप जोशी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून नागरिकांना भावनिक साद घातली. ४५ हजार बाधित असले तरी यातील ३४ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी व्हीडीओ संदेशात नमुद केले.

मला कोरोना होईल का?, झाला तर मी वेळेवर कुठे धावाधाव करू?, मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही व्हायला नको?, अशी धास्ती शहरातील सर्वांनीच घेतली आहे. परंतु, श्रीमंतांनी कोरोनाची अधिक धास्ती घेतली आहे. यामुळेच त्यांनी खासगी रुग्णालयांत बेड्स आरक्षित करून ठेवले आहेत. वेळेवर बेड्स न मिळाल्यास आपल्या किंवा नातेवाईकाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांनी ही सोय करून ठेवली आहे. परिणामी गरजू रुग्णांना बेड्स मिळत नाही आहे. आमच्यातीलच काही लोकं असे आहेत की, तब्येतीला काहीही झालेलं नाही. प्रकृती उत्तम आहे. इम्युनिटी पॉवरही चांगली आहे. परंतु, मला काहीतरी होईल, या धास्तीने बेड्स अडवून ठेवले आहेत.

साकोली तालुक्‍यातील जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी शिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. परंतु, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभाग यापासून अनभिज्ञ आहे. गेल्या मार्चपासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. ग्रामीण भागात लोकांना कामधंदे नाहीत. बेरोजगारामुळे युवक मंडळी दिवसभर पानटपऱ्यांवर बसून दिसतात. रात्रीच्या वेळी विरळ जंगलाचा फायदा घेऊन शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करीत आहेत. सध्या शेतातील पिकाकडे तृणभक्षक प्राणी येतात. अशावेळी वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे असल्यामुळे अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

सध्या कोरोनाचे दिवस आहे़त. कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी योग्य ते बंधन पाळणे आवश्यक आहे़. यात सामाजिक अंतर व मास्कचा वापर महत्वाचा आहे. मात्र, काही नागरिक मास्क व सोशल डिस्टिंगचा वापर करीत नसल्याचे सध्या चित्र आहे़. एख?
Recommended