नागपुरात तलावातील पाण्याचे परीक्षण | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
नागपूर : ग्रीन व्हिजिल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था अर्थ इको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने आठ वर्षांपासून शहरातील मुख्य तलावांवर गणपती विसर्जनाच्या प्रभावाची चाचणी करीत आहे. याअंतर्गत वर्षातून तीनवेळा शहरातील फुटाळा, सोनेगाव, गांधीसागर आणि सक्करदरा तलावातील पाण्याचे परिक्षण केले जाते. सोमवारी फाउंडेशनच्या प्रमुख सुरभी जैस्वाल व अन्य सदस्यांनी फुटाळा येथील तलावाच्या पाण्याचे नमूने घेतले. गणपती विसर्जनानंतरही पाण्याचे नमूने घेण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जनामुळे पाणी किती प्रदूषित झाले, हे कळणार आहे. शहरातील तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागपूरकरांनी मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended