नागपूर शहरात नागरिकांनीच घेतली पहिली मोहल्ला सभा | Latest Marathi News I मराठी बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
नागपूर : ग्रामसभा आपल्याला माहित आहे. गावाच्या पातळीवर घेतलेल्या सभांना ग्रामसभा म्हणतात. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभांना मोठे अधिकार आहेत. ग्रामसभा सर्वत्र होतात. त्यामुळे त्या परिचित आहेत. शहरातील नागरिकांनी शहरात घेतलेल्या सभांना मोहल्ला सभा किंवा प्रभाग सभा किंवा वाॅर्ड सभा म्हणतात. गुजरातमधील काही भाग आणि दिल्ली शहरात यापूर्वी मोहल्ला सभा झाल्याचे ऐकिवात आहे. परंतु नागपूर शहरात स्वतः नागरिकांनी मोहल्ला सभा घेतल्याचे दिसत नाही. परंतु शुक्रवारी जोगी नगर आणि रामटेके नगर परिसरातील नागरिकांनी स्वतःहून मोहल्ला सभा घेतली. त्यात या भागातील समस्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे या भागातील एकमेव मैदानावर मनपाच्या वतीने होत असलेल्या बांधकामाला या मोहल्ला सभेतून विरोध करण्यात आला. मोहल्ला सभेला नगरविकास मंत्रालयांतर्गत मोठे अधिकार दिले आहेत. स्थानिक प्रशासन मोहल्ला सभांतील ठरावांवर किती दिवसांत निर्णय घेते, हे बघण्यात येईल. त्यानंतर नगरविकास मंत्रालयात यावर दाद मागण्यात येईल, असे मोहल्ला सभा आयोजित करणाऱ्या नागरिकांनी सकाळ प्रतिनिधींना सांगितले.
(व्हिडिओ - प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended