गणेशोत्सवात प्रथमच शारदा गजाननाची मंदिरात प्रतिष्ठापना | Latest News I Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
गणेशोत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच पुण्यातील अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलवण्यात येणार नाही, मंडळाच्या शारदा गजाननाची गेल्या १२७ वर्षांत गणेशोत्सवात प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे.
यावेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अखिल मंडई मंडळाच्या अनेक चांगल्या उपक्रमांचे अनुकरण पुण्यातील इतर मंडळे करतात. त्यामुळे यंदाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आले आहे.
बाईट- अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ
#AkhilMandai 3ShardaGajanan #Ganeshotsav #Marathi #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended