बांबू बनला जगण्याचा आधार, राख्यांना देशभरातून मागणी | Latest Marathi News I मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
चंद्रपूर : मीनाक्षी सोनटक्के-वाळके यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लग्नानंतर कुटुंबात रममाण झाल्या. काहीतरी करावे या विचारातून बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आदिवासी समाजातील महिलांच्या मदतीने बांबूपासून वस्तू तयार करून विक्री करणे सुरू केले. एक-एक करीत सर्व प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसाद केले. आजघडीला बांबूपासून राख्या तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत देशातील दिल्ली, झारखंड, जबलपूर, ठाणे, पुणे, मुंबई, गुडगाव येथून राख्यांना मागणी आहे. तब्बल पाच ते सहा हजार राख्यांची विक्रीसुद्धा झाली. 2019 मध्ये झालेल्या जागतिक दर्जाच्या ब्यूटी कॉन्सेप्ट स्पर्धेत मुकुट बांबूपासून तयार केलेली देशातील पहिली महिला होण्याचा बहुमानही पटकावला. जाणून घ्या त्यांची यशोगाथा.
(व्हिडिओ : साईनाथ सोनटक्के)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended