देवमुर्ती, तांबा-पितळी धातूच्या कलाकुसरीची विक्री कमी Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर : देव्हारा, मंदिरात मुर्ती येते; पण इथे येईपर्यंत मुर्तीवर अनेक संस्कार होतात. अक्षरश: अग्निदिव्यातून ही मुर्ती तावूनसुलाखूण निघते. श्री अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी चौक रस्ता इथे अनेक मुर्ती विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवली जाते. ही मुर्ती घेण्यासाठी पूर्वी खूप गर्दी असायची; मात्र 21 मार्चनंतर कोरोनामुळे (कोविड-19) लॉकडाऊन झाले. परिणामी, श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा ओघ कमी झाला. परिणामी मुर्तींची विक्री कमी झाली.

बातमीदार - अमोल सावंत
व्हिडिओ - बी. डी. चेचर
Recommended