Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/6/2025
रायगड - रायगड किल्ल्यावर शिवप्रेमींनी पुन्हा एकदा इतिहास जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा वर्धापनदिन रायगड किल्ल्यावर अत्यंत उत्साही वातावरणात आणि पारंपरिक थाटात साजरी करण्यात आली. राज्याभिषेकावेळी रायगडावर देशभरातून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. भगवे झेंडे, डमरू, लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात सकाळपासूनच किल्ल्यावर जय भवानी! जय शिवाजी! चा जयघोष घुमत होता. किल्ले रायगडाच्या मुख्य दरवाजापासून ते जगदीश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये शिवकालीन पोशाखातील मावळे, तलवारी, ढाल घेऊन सहभागी झाले होते. महाराजांचा सिंहासनावर राज्याभिषेक होतोय, असा देखावा खास तयार करण्यात आला. या सोहळ्यात इतिहास अभ्यासक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राज्यांमधील शिवप्रेमींचा सहभाग मोठ्या संख्येने होता. रायगडावर फडके, लेझीमपथक आणि लोककलांच्या माध्यमातून महाराजांचा पराक्रम दाखवण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच इतिहासप्रेमींसाठी व्याख्यान सत्र, शिवकालीन अस्त्रे, शस्त्र प्रदर्शन, त्याकाळातील राजकारण आणि राज्यकारभारावर आधारित प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. राज्य सरकारतर्फे सुरक्षिततेची आणि सोयीसुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत राज्याभिषेकाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Category

🗞
News
Transcript
00:00I
00:30I
00:34I
00:38I
00:42Oh
00:52You

Recommended