आश्रमशाळेतील मुलींच्या संरक्षणासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मोठा निर्णय Mangal Prabhat Lodha
  • 2 years ago
मुंबईतील गोवंडी परिसरातील शासकीय मुलींच्या वसतिगृहातून शौचालयाची खिडकी आणि ग्रील तोडून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या आहेत. ही घटना ११ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. भल्या पहाटेच मुली पळून गेल्याची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेबाबत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली असून आश्रमशाळेतील मुलींच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

#MangalPrabhatLodha #BJP #GowandiBalSudhargruha #ReformatorySchool #Deonar #Mumbai #GirlsHostel #GirlsAbsconded #HWNews
Recommended