Uttar Pradesh Flood : उत्तर प्रदेशमध्ये नद्यांना पूर, मगरी रस्त्यावर ABP Majha

  • 2 years ago
उत्तर प्रदेशच्या कानपूर, प्रयागराज आणि वाराणसीत गंगा आणि यमुनेला पूर आलाय. प्रयागराजमध्ये गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुराच्या पाण्यातून आलेली एक मगर शनिवारी प्रयागराजच्या सलोरी या निवासी भागात शिरली. सुमारे १२ फुटांची ही महाकाय मगर पाहून नागरिकांची भीतीने गाळण उडाली. लगेचच पोलीस आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला पकडून पुन्हा गंगेत सोडण्यात आले. वाराणसीत गंगेची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा २४ सेंटीमीटरने जास्त आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाट पुरात बुडाले आहेत. कानपूरमध्येही यमुनेची पाणीपातळी वाढलीय.

Recommended