Noida Twin Towers : 'ट्विन टॉवर' गुडूप, वादग्रस्त इमारत अखेर जमीनदोस्त
  • 2 years ago
Noida Twin Towers Demolition : देशातील सर्वात उंच इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अखेर जमीनदोस्त झालं आहे. याची बरेच दिवसांपासून चर्चा होती. आता शेवटी ट्विट टॉवर पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं.  एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. हे ट्विन टॉवर्स (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. विशेष म्हणजे, बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार झाला. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळच धूळ पसरली. खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टानं ट्विन टॉवर म्हणजे अॅपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे आदेश दिले आहेत.
Recommended