किटमध्ये आलेल्या रबरी लिंगाचा बाऊ कशाला? आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन

  • 2 years ago
राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि त्याचाचे एक भाग म्हणून सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किट मध्ये आशा वर्कर्स ना रबरी लिंग दिलं होत.आरोग्य किटमध्ये दिलेल्या रबरी लिंगावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला होता...मात्र आता या किटला अनेक स्तरातून मान्यता मिळताना दिसतेय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या रबरी लिंगाबाबत जास्त बाऊ न करण्याचे आवाहन केलं. हे लिंग फक्त नागरिकांना जनजागृती करण्यासाठी देण्यात आले असून अनेक लोक आजही गर्भनिरोधक साधनांचा बाऊ करतात. अनेकांना कंडोमचा उपयोगही माहिती नाही. त्यामुळे हे किट उपयुक्त ठरत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Recommended