Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/2/2022
महाराष्ट्रात गुन्हेगारी डोकं वर काढत असतानाच गेल्या चार दिवसात अशा काही घटना घडल्यात, ज्याने पोलिसांसमोरचंही आव्हान वाढलंय. कारण, नेहमीच संवेदनशील शहर म्हणून ओळख असणाऱ्या औरंगाबादेत ३७ तलवारी कुरिअर करण्यात आल्या. याचा शोध सुरू असतानाच पुन्हा पुण्यातही अशीच घटना घडली. आधी औरंगाबाद आणि आता पुणे, महाराष्ट्र कुणी अशांत करण्याचा प्रयत्न करतंय का आणि या तलवारी नेमक्या कुठून येत आहेत याचा शोध पोलीस घेतायेत. पुणे आणि औरंगाबादमधल्या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. पुण्यातल्या कुरिअर कंपनीने स्वतःहून याबाबतची माहिती पोलिसांना दिली, तर औरंगाबादमध्ये मात्र पोलिसांनाच खोलात जाऊन माहिती घ्यावी लागली.

Category

🗞
News

Recommended