किन्नर असलो म्हणून जगण्याचा अधिकार नाही? तृतीयपंथीयांची जगण्याची लढाई

  • 2 years ago
तृतीयपंथी व्यक्तींना सगळीकडे भेदभावाला सामोरं जावं लागतं. घरात, शाळेत, घर मिळण्यात आणि रस्त्यावरही. सामान्य माणूस म्हणून घेण्यासाठी आणि थोडी फार प्रतिष्ठा असलेलं काम मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.मुंबईतीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तृतीयपंथीयांना स्वतःचं किंवा भाड्याचं घर घेताना आलेला अनुभव कटू आहे. स्वतःची जागा नसेल, तर डोक्यावर छप्पर मिळवताना होणारी घुसमट असह्य असल्याचा अनुभव तृतीयपंथी उद्वेगाने सांगतात. आमच्याशी बोलायला, आम्हाला स्पर्श करायला घाबरणारा समाज आम्हाला सहेतुक टोमणे मारण्याची एकही संधी समाज सोडत नाही, पूर्वी असलेली गडद भीती आता राहिलेली नसली, तरीही 'ते नकोत' हा सूर एकायला मिळतो. तृतीयपंथीयांना आपलंसं करण्यासाठी राजकीय पक्षही आता मागे राहिले नाहीत. पण फक्त या योजनांची कोगदोपत्रीच नोंद झालीये. प्रत्यक्षात या काय योजना आहेत आणि त्या आपल्या समाजापर्यंत कशा पोहोचवायच्या याबद्दलची माहिती अद्यापही या तृतीयपंथीयांना माहित नाही.