एकरी १०० रुपये मोबदला आणि धरणग्रस्तांची चिमणी-पाखरांसारखी गत

  • 2 years ago
कुडाची पडकी आणि मोडकी घरं, व्यवस्थेसमोर हतबल झालेले चेहरे आणि सुन्न रस्ते... ही त्याच महाराष्ट्रातली अवस्था आहे जिथे आमदारांना वाहनं घेण्यासाठी कर्ज दिलं जातं, आमदारांना घरं दिली जातात, दारुची विक्री सुपर मार्टेकमध्ये करण्याचीही परवानगी मिळते. पण हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील खडकी गावची मन सुन्न करणारीय. मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर १९५८ - १९६८ च्या कालावधीदरम्यान ७०३ दश लक्ष घनमीटर क्षमतेचं येलदरी धरण उभारलं गेलं. याला ५० वर्षांचा कालावधी उलटूनही अंदाजे ४२ गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्यापही मार्गी लागलेला नाही. या गावातील लोकांना पोट भरण्यासाठी ना साधन आहे, ना लेकरांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सुविधा..

Recommended