Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/29/2022
इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती रस्त्याच्या बाजूला द्राक्ष विकताना दिसत आहे. गाणं गात ही व्यक्ती लोकांना काला अंगुर म्हणजेच काळी द्राक्षं घेण्यासाठी आवाहन करत आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘कच्चा बादाम’ गाण्यानं सर्वांना अक्षरश: वेड लावलं. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवले आहेत. अशातच आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक माणूस अतिशय विनोदी अंदाजात काळी द्राक्ष विकताना या व्हिडिओमध्ये दिसून येतोय.. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती रस्त्याच्या बाजूला द्राक्ष विकताना दिसतोय तेही गाणं गात. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.लोकांना हा व्हिडिओ खूप आवडतोय. ‘काला अंगूर’ गाणं ऐकून हसू आवरत नसल्याचं अनेकांनी म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.कच्चा बादाम नंतर आता काला अंगुरचाही ट्रेंड येईल अस दिसतय.

Category

🗞
News

Recommended