Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/28/2022
नाशिकमध्ये बंद गाळ्यांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील मुंबई नाका पोलीस स्टेशन लगत असलेल्या बिल्डिंगमधील बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.जवळपास पंधरा वर्षापासून हे गाळे बंद असल्याचा गाळा मालकाने दावा केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात त्याचं पद्धतीने हे अवयव संकलन केलेले दिसून आले.पोलिसांनी तपास केला असता गाळ्यांमध्ये वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले होते.एका बादलीत तर चक्क आठ कान आढळून आले आहेत. गाळा जांच्या मालकिचा आहे त्या शुभांगी शिंदेची मुलं डॉक्टर आहे. त्यांच्या डॉक्टर किरण शिंदे यांनी त्यांच्या वैद्यकिय सरावासाठी हे अवयव रुग्णालयातून आणल्याचा दावा केलाय मात्र असे अवयव आणण कितपत कायदेशीर आहे याबाबत पोलीस अधिक तपास करतायत. या सर्व प्रकारानंतर परिसरात मात्र खळबळ उडाली आहे

Category

🐳
Animals

Recommended