मुंबई ते बीड रेल्वेची प्रितम मुंडेंची मागणी रेल्वे मंत्रालय पूर्ण करणार?

  • 2 years ago
बीड जिल्हावासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प सध्या जलद गतीने पूर्णत्वाकडे जातो आहे. या प्रकल्पाचा नगर ते आष्टी दरम्यानच्या लोहमार्ग कामाचा टप्पा पूर्ण झाला. गेल्यावर्षी नगर ते आष्टी दरम्यानचा एकसष्ठ किमीच्या लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत नगर तर आष्टी दरम्यान रेल्वेची ट्रायल घेण्यात आली होती. हा रेल्वे मार्ग पूर्णपणे प्रवासी वाहतुकीस सज्ज असल्यामुळे मुंबई-नगर-आष्टी दरम्यान प्रवासी वाहतुक सुरू करण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे, म्हणूनच प्रितम मुंडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करावी अशी मागणी आता खासदार प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केलीये.
प्रितम मुंडे यांचा पाठपुरावा आणि रेल्वे राज्यमंत्र्यांच्या प्रतिसादाने लवकरच मुंबई ते आष्टी रेल्वे सेवा सुरू होईल अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील नागरीकांमधून व्यक्त होते आहे.

Recommended